Marathi Catholic Logo

Marathi Catholic

Prayers and songs

रोसरी ची प्रार्थना
✝️ कुसाची खूण
- हे परमेश्वरा
- पवित्र क्रुसाच्या या खुणेने
- आमच्या शत्रूंपासून आम्हाला सोडव

- पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे
- आमेन.

प्रेषितीय श्रद्धाप्रकटन
स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्नकर्ता / सर्वसमर्थ परमेश्वर पिता / आणि त्याचा एकुलता पुत्र / येशू ख्रिस्त / आपला प्रभू / ह्यांच्यावर मी विश्वास ठेवतो / तो पवित्र आत्म्याच्या योगाने / गर्भी संभवला / कुमारी मरियेपासून जन्मला / पोन्ती पिलाताच्या अंमलाखाली / त्याने दुःख भोगले / त्याला क्रुसावर खिळण्यात आले / तो मरण पावला / त्याला पुरण्यात आले / तो अधोलोकांत उतरला / तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला / स्वर्गात चढला /आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या / उजवीकडे / विराजमान झाला आहे / तेथून तो जिवंत / आणि मेलेले / ह्यांचा न्याय करण्यासाठी / पुन्हा येईल / पवित्र आत्मा / पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा / संतांचा एकोपा / पापांची क्षमा / देहाचे पुनरुत्थान / आणि सर्वकाळचे जीवन / ह्यांवर माझा विश्वास आहे / आमेन.

✝️ आमच्या स्वर्गातील
आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

आमची दररोजची भाकर आज आम्हांला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हांला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हांला सोडव. * आमेन.

नमो कृपापूर्ण मरिये
नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.

हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, *आमेन.

🕊️ त्रैक्य स्तुती
पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो.
जसा प्रारंभी, तसा आता आणि सदासर्वदा. आमेन

हे माझ्या येशू तू आमुच्या पापांची क्षमा कर, पाप दंडा पासून आमूचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना वीशेषकरून, ज्यांना तुझ्या दयेची गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने आमेन

🎵 गायणामध्ये पाच रहस्से
१. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठायी आहे,
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू

हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी सदा
आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन

पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो
जसा पारंभी तसा आता आणि सदा सर्वदा



२. नमो मरिया कृपापूर्ण तू अमला नारी प्रभूचे सुंदर धाम
पावन मरिया देव माता हो आम्हांस तव विणव आता आणि मृत्यु समयी

पिता व पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो
जसे प्रांरभी तसे आता आणि सदा सर्वदा होवो.



३. प्रणाम मरिये कृपापूर्ण मा,
धन्य तू स्त्रियों में धन्य तेरा फळ येशू
प्यारे मरियम प्यारे मरियम प्रार्थना करना हमारे लिये |२|

पिता पुत्र पवित्र आत्मा
पिता की महिमा हो सदा सर्वदा |२|



४. नमो मरिये माझी आई स्त्रिंयामध्ये धन्य सदा
रोगी आम्हीं पापी आम्हीं पीडितांसाठी विनंती करा

पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो
जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा होवा



५. गाठी सोडविणाऱ्या |२|
गाठी सोडविणाऱ्या आईव्दारे
येशूवर प्रेम करितो

आबा पित्यावर प्रेम करितो
प्रभू येशूवर प्रेम करितो
पावन आत्म्यावर प्रेम करितो